Thursday 30 June 2022

Annual Report of Geography Department 2021-22

 

भूगोलशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल २०२१-२२

सन २०२१-२२ या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आले


१)    दि. १६.०९.२०२१ रोजी जागतिक ओझोनदिनानिमित्ताने ऑनलाईन प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले होते.


२)    दि. २७.०९.२०२१ रोजी जागतिक पर्यटनदिनानिमित्ताने ऑनलाईन प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले होते.


३)    भूगोलशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रविण जाधव व प्रा. डॉ. बसवराज माळी यांनी IIRS, Dehradun यांच्याकडे Geospatial Analysis of Landslide Susceptibility and Zonation using UAV in Ratnagiri and Satara District” या विषयावर Major Research Project Proposal पाठविले आहे.


४)    दि. ०६ ते १७ डिसेंबर २०२१ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत ९३- IIRS Outreach Programme on “Geo-informatics for Biodiversity Conservation Planning”  चे आयोजन करण्यात आले होते.

    Certificate_COR202193878


५)    भूगोलशास्त्र विभागातील विद्यार्थांनी गंथालय व ग्रंथालयातील Text book आणि संदर्भग्रंथ यांची माहिती मिळण्याच्या दृष्टीने दि. २४.१२.२०२१ रोजी “ग्रंथालय भेटीचे” आयोजन करण्यात आले होते.


६)    दि १४.०१.२०२२ रोजी दरडींच्याअभ्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरया विषयावर प्रा. डॉ. सुभाष कारंडे, सहा.प्राध्यापक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांचे  आझादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत व्याख्यान भूगोलशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रविण जाधव यांनी केले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ साहेब होते तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बसवराज माळी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी ५० विद्यार्थी व प्रध्यापक यांनी सहभाग नोंदविला.


७)    भूगोलशास्त्र विभागामार्फत दि. २८.०१.२०२२ रोजी “भूमिपात : एक आपत्ती” या विषयावर भितीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते. सदर भितीपत्रिकेचे उद्घाटन कार्याध्याक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.


८)    Basics of Geoinformatics (R.S., G.I.S. & G.N.S.S.)” हा स्वयं-अर्थसाह्य कोर्स दि. २.३.२०२२ ते ३१.५.२०२२ या कालावधीत भूगोलशास्त्र विभागामार्फत सुरु आहे. सदर कोर्स चे समन्वयक प्रा. डॉ. एच. एस. सानप असून या कोर्ससाठी ०९ विद्यार्थांनी प्रवेश घेतलेला आहे.


९)    दि. २४.०३.२०२२ रोजी बी.ए. भाग ३ च्या विद्यार्थांचे ग्राम सर्वेक्षण म्हाते खु. या गावी आयोजित करण्यात आला होता. सदर ग्राम सर्वेक्षणाचे नियोजन प्रा. डॉ. प्रविण जाधव यांनी केले.


१०) भूगोलशास्त्र विभागाची २०२१-२२ या वर्षाची शैक्षणिक सहल दि. ३०.०४.२०२२ रोजी सातारा –  पुणे - वाई – पाचगणी – महाबळेश्वर – मेढा – सातारा या मार्गाने आयोजित करण्यात आली होती. सदर सहलीचे नियोजन प्रा. डॉ. बसवराज माळी यांनी केले.


११)      भूगोलाशास्त्र विभागामार्फत आझादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत दि. २२.०४.२०२२ रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने विद्यार्थांना प्रा. डॉ. हनुमंत सानप यांनी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. बी. डी. सगरे होते. प्रा. डॉ. बसवराज माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमास ४८ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.


        वरील सर्व उपक्रम यशस्वी रीत्या पार पडले असून यासाठी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आर व्ही शेजवळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच भूगोल विभागातील प्रा. डॉ. बी. एम. माळी व  प्रा. डॉ. एच. एस. सानप यांचे सहकार्य लाभले.

 

प्रा. डॉ. प्रविण रामचंद्र जाधव

विभाग प्रमुख

0 comments:

Post a Comment