Ganpatipule

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Dona Paula viewpoint

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Rainy Tour

Place - Chalkewadi, 2019-20

Rainy Tour

Place-Sajjangad 2019-20

Thursday 30 April 2020

Annual Report of Geography Department 2019-20

 

भूगोलशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल २०१९-२०

सन २०१९ - २०२० या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले

१)               सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रा. डॉ. पी. आर. जाधव यांना पुणे विद्यापीठाची तसेच प्रा. डॉ.बी. एम. माळी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी व प्रा. डॉ. एच. एस. सानप यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांची पदवी प्राप्त झाली. याच शैक्षणिक वर्षात बी. भाग दोन साठी मृदा भूगोल, साधन संपत्ती भूगोल, कृषी भूगोल व सागरशास्त्र या क्रमिक पुस्तकांचे लेखन व प्रकाशन प्रा. कु. चव्हाण एस. एन. यांनी केले.

२)            सन-२०१९-२० या वर्षात भूगोलशास्त्र विभागामार्फत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या प्रौढ व निरंतर विभागाच्या सहकार्याने Travel & Tourism हा coc कोर्स राबविण्यात येत आहे. सदर कोर्स साठी विभागातील  ११ विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे.

३)   सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून भूगोलशास्त्र विभागामार्फत Basics of Geoinformatics” हा नवीन कोर्स सुरु करण्यात आला आहे. सदर कोर्ससाठी विभागातील १० विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे.

४)     दि २७/०७/२०१९ रोजी Tourismand Entrepreneurshipया विषयावर प्रा. डॉ. रतनकुमार हजारे, एलफिस्टन कॉलेज, मुंबई यांचे व्याख्यान भूगोलशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते.

५)                 भूगोलशास्त्र विभागामार्फत दि. २४/०८/२०१९ रोजी वर्षा सहल आयोजित केली होती. सदर सहलीचा मार्ग हा “सातारा-सज्जनगड- ठोसेघर- चाळकेवाडी- सातारा” होता. 

                या सहली दरम्यान “दरड प्रवणक्षेत्र – काळोशी” या गावाला भेट देण्यात आली.

६)                 दि. १२ ते २३ सप्टेंबर २०१९ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत 52-IIRS Outreach Programme on Global Navigation Satellite Systemचे आयोजन करण्यात आले होते. या कोर्ससाठी १० विद्यार्थांनी प्रवेश घेतला होता. (Sample Certificate)

७)               दि. २३/१२/२०१९ रोजी भूगोलशास्त्र विभागामार्फत “Remote Sensing ofthe Moon by Indian Lunar Missions with Emphasis on Spectroscopic Analysisया विषयावर IIRS, Deharadun यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस १३ विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. (Sample Certificate)

८)               दि ३०/१२/२०१९ रोजी मैजे नागेवाडी ता./जि. सातारा येथे लोकसंख्या विषयावर ग्राम सर्वेक्षण केले.

९)               दि. ०६/०१/२०२० रोजी Climate change” या विषयावर प्रा. एन. एस. घुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद यांचे व्याख्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत  आयोजित करण्यात आले होते.

१०)         दि १५/०१/२०२० रोजी अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत Water Management या विषयावर प्रा. यु. बी. जाधव यांचे भूगोलशास्त्र विभागामार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

११)         दि ०१/०२/२०२० ते ०३/०२/२०२० रोजी विभागामार्फत भूगोलिक शौक्षणिक सहल आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कोकण व गोवा येथील भोगोलिक व सांस्कृतिक प्रक्षेणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या. तसेच पार्वतीबाई चौगुले कॉलेज, मडगाव, गोवा यांच्याबरोबर सामंजस्य करारा अंतर्गत Faculty exchange programme अंतर्गत प्रा. डॉ. पी. आर. जाधव व प्रा. एच. एस. सानप यांची व्याख्याने झाली व त्याच बरोबर भूगोलातील करीअर संबंधी  मार्गदर्शन प्रा. डॉ. अनिल येडगे (पार्वतीबाई चौगुले कॉलेज, मडगाव, गोवा ) यांनी केले.

        वरील सर्व उपक्रम यशस्वी रीत्य पार पडलेली असून यासाठी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आर व्ही शेजवळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच भूगोल विभागातील प्रा. डॉ. माळी बी एम, प्रा. एच. एस. सानप व प्रा. कु. एस. एन. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

 

 

प्रा. डॉ. प्रविण रामचंद्र जाधव

विभाग प्रमुख